
कराड : एकीकडे रशिया- युक्रेनच्या युद्धाचा भडका शमलेला नसतानाच युक्रेनचे नागरीक जीवाच्या आकांताने इकडे-तिकडे सैरभैर होत फिरत आहेत. अशा परिस्थितीतच साताऱ्यातील महामार्गालगत असणाऱ्या एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री युक्रेनच्या नागरिकाचा संशयस्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोडेलीली ओलेस्की (वय ३९) असे मृत युक्रेन नागरिकाचे नाव असून, सातारा शहर पोलिसांनी मात्र आकस्मित मयत अशी नोंद पोलीस ठाण्यात केली आहे; मात्र साताऱ्यातील एका कंपनीची तपासणी करण्यासाठी म्हणून आलेल्या या परदेशी पाहुण्याचा मृत्यू संशयास्पद असल्याने या घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी होत आहे