Fire at Lullanagar, Pune : पुण्यातील एका इमारतीत चौथ्या मजल्यावर असलेल्या हॉटेलला आग

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्याही दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी 2 टँकरही प्रयत्न
Fire at Lullanagar, Pune : पुण्यातील एका इमारतीत चौथ्या मजल्यावर असलेल्या हॉटेलला आग

Massive Fire at a Restaurant near Lullanagar, Pune पुण्यातील कोंढवा परिसरात एका इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कोंढव्यातील लुल्लानगर चौक परिसरात घडली. मंगळवारी सकाळी प्रत्यक्षदर्शींनी या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून धूर येत असल्याचे पहिले. त्यानंतर या ठिकाणाहून मोठमोठ्या ज्वाळा उठताना दिसत होत्या.

कोंढव्यातील लुल्लानगर चौक मार्वल व्हिस्टा बिल्डिंग येथे आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्याही दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी 2 टँकरही प्रयत्न करत आहेत. हॉटेल इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in