पाचगणीतून पॅराग्लाइडिंग करताना भरकटला, फ्रेंच नागरिक ६ तासांनंतर आटपाडीत उतरला

सध्या भारतात पर्यटनासाठी आलेला फ्रेंच नागरिक पियर अलेक्स हा पाचगणी येथे आल्यानंतर त्याला येथील पॅराग्लाइडिंग करण्याचा मोह आवरला नाही.
पाचगणीतून पॅराग्लाइडिंग करताना भरकटला, फ्रेंच नागरिक ६ तासांनंतर आटपाडीत उतरला

कराड : सातारा जिल्ह्यातील पाचगणीत नुकतेच पॅराग्लाइडिंग सुरु करण्यात आलेले आहे.याचा आनंद लुटण्यासाठी येथे अनेक परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत.असाच एक फ्रेंच पर्यटक पाचगणी येथे आला असता त्याला पॅराग्लाइडिंग करण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र तो पॅराग्लाइडिंग करत असताना त्याचे पाचगणीतून भरकटलेले पॅराग्लाइडर सहा तासानंतर आटपाडी तालुक्यातील दिघंची, जि सांगली येथे एका शेतात उतरल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

सध्या भारतात पर्यटनासाठी आलेला फ्रेंच नागरिक पियर अलेक्स हा पाचगणी येथे आल्यानंतर त्याला येथील पॅराग्लाइडिंग करण्याचा मोह आवरला नाही. त्याने पाचगणीतून थेट पॅराग्लाइडिंग आकाशात झेप घेतली. पॅराग्लाइडिंग करत असताना तब्बल सहा तास तो भरकटला व आटपाडी तालुक्यातील आवळाई रस्त्यावरील मोरे यांच्या शेतात तो कसाबसा सायंकाळच्या सुमारास उतरला.तो उतरल्यानंतर त्याला पाहण्यासाठी तेथे मोठी गर्दी जमली हाेती. मात्र अॅलेक्स याने घडलेली घटना सांगितल्यानंतर तेथील युवकांनी पाहुणचार करून या परदेशी पाहुण्याला खासगी माेटारीतून पाचगणीकडे रवाना केले.

विशेष म्हणजे या अगोदर चारच दिवसांपूर्वीही पिअर अलेक्स भरकटून सांगोला तालुक्यातील इटकी,जि सोलापूर येथे आला होता.सुट्टीत भारतात पर्यटनासाठी अनेक फ्रेंच नागरिक येतात.मात्र पॅराग्लाइडिंगसाठी ते सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे पोहोचतात. पॅराग्लाइडिंग हा धाडसी लोकांचा छंद आहे. त्यासाठी पाचगणी येथे परदेशी लोकांची माेठी गर्दी असते.पण पॅराग्लाइडिंगचा अनुभव नसेल तर अनेकदा वाऱ्याचा अंदाज न आल्याने पॅराग्लाइडर भरकटतात. असाच प्रकार पियर अलेक्सबाबत घडला. पाचगणी येथून निघाल्यानंतर तब्बल सहा तास ताे हवेत भरकटला.मात्र सुदैवाने कोणताही धोका न होता तो सुखरूप जमिनीवर उतरला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in