कुडणूर जिल्हा परिषदेच्या शाळेत हॅन्डग्रेनेड सापडल्याने खळबळ

शनिवारी सकाळी खेळाच्या सुट्टीत मुले खेळत खेळत आतील खोलीत गेली असता मुलांना हॅन्डग्रेनेड सापडले.
 कुडणूर जिल्हा परिषदेच्या शाळेत हॅन्डग्रेनेड सापडल्याने खळबळ

जिल्ह्यातील जत तालुक्यातील कुडणूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना जिवंत हॅन्डग्रेनेट सापडल्याने खळबळ उडाली आहे. पाच वर्षांपुर्वी याच गावात शाळकरी मुलांना हॅन्डग्रेनेड सापडले होते.

डफळापूरनजीक कुडणूर गाव आहे. गावातील प्राथमिक शाळेचे बांधकाम सुरू असल्याने सदाशिव व्हनमाने यांच्या घरात सहावीचा वर्ग भरविण्यात येत आहे. व्हनमाने कुटूंबिय सध्या सांगलीला राहण्यास आहे. सणासुदीलाच व्हनमाने कुटूंबिय गावी येतात. शनिवारी सकाळी खेळाच्या सुट्टीत मुले खेळत खेळत आतील खोलीत गेली असता मुलांना हॅन्डग्रेनेड सापडले. त्यांनी तो शिक्षकांना आणून दाखवला. शिक्षकांना हा बॉम्ब असल्याचे लक्षात येताच त्यांनी याची माहिती गावातील पोलीस पाटील, सरपंच यांना दिली.

जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी तातडीने चक्रे फिरवित जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांना सूचना दिल्या तसेच सांगलीतील बॉम्बविरोधी पथक, श्वानपथक यांना पोलिसांनी पाचारण केले. पथकाने हॅन्डग्रेनट ताब्यात घेतले. त्यानंतर ज्या ठिकाणी हॅन्डग्रेनेट सापडले, त्या जागेची पाहणी केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in