विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार

विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार

पीडित मुलगी ही तिचा मोबाईल खराब झाल्याने तो रिपेअर करण्यासाठी जात असताना तिची मैत्रीण तिला वाटेत भेटली

विरारमध्ये राहणाऱ्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या मैत्रिणीच्या दोन मित्रांनी मंगळवारी रात्री सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. तर एकाने पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य केले. विरार पोलिसांनी बुधवारी पीडितेच्या मैत्रिणीसह चौघांवर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगी ही तिचा मोबाईल खराब झाल्याने तो रिपेअर करण्यासाठी जात असताना तिची मैत्रीण तिला वाटेत भेटली. मैत्रिणीने तिला फिरायला जाऊ, असे बोलून एका झोपडपट्टीच्या मागील सार्वजनिक ठिकाणी घेऊन गेली. मैत्रिणीने तिच्या तीन मित्रांना फोन करून सदर ठिकाणी बोलावून घेतले. तिघे जण त्या ठिकाणी आल्यावर मैत्रिणीने पीडितेला एकाला तुझ्यासोबत शारीरिक संबंध करू दे, नाही तर तो बदनामी करेल, अशी धमकी दिली. दोन आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. तर आणखी एकाने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. याप्रकरणी तिन्ही आरोपींवर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर दोन आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in