महिनाभर उशिराने लाल कांदा दाखल

४ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव ; गतवर्षीपेक्षा २ हजार रुपयांनी कांदा दर वाढ
महिनाभर उशिराने लाल कांदा दाखल

लासलगाव: यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्याने लाल कांदा ऑक्टोबर एवजी नोव्हेंबर मध्ये महिनाभर उशिराने बाजारपेठेत दाखल झालेला आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात लाल कांद्याचे आगमन वेळी कांद्याला सरासरी २००० रुपये भाव मिळाला होता. कमी पावसामुळे लाल कांदा शेतातून काढणीस यंदा उशीर झाल्याने कमी प्रमाणात लाल कांद्याचे आगमन बाजार आवारामध्ये होऊ लागले आहे ,गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २ हजार रुपयांनी लाल कांद्याच्या दारात वाढ झाली असून लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला कमाल ४६४७ व सरासरी ४००० रुपये भाव मिळत आहे.

दरवर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावर ऑक्टोबर महिन्यात लाल कांद्याचे आगमन होत असते. उन्हाळ कांदा संपुष्टात येत असताना लाल कांदा बाजारपेठेत दाखल होतो. त्यावेळी उन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याला देखील आगमन काळात चांगला बाजारभाव मिळत असत गतवर्षी समाधानकारक चांगला पाऊस होता परिणामी लाल कांदा नेहमीप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात बाजारपेठेत दाखल झाला त्यावेळी किमान ५०० रुपये कमाल ३१०० सरासरी २००० रुपयांनी लाल कांदा विक्री झाला होता.

चालू वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दोन दिवस अत्यंत कमी प्रमाणात लाल कांदा बाजारआवरावर आला होता. नोव्हेंबरचे तिसरा आठवडा लोटले असले तरी लाल कांद्याची पाहिजे तशी आवक अजूनही झालेली नाही. सध्या लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची दररोज फक्त ८०० ते एक हजारच्या आत क्विंटल कांद्याची आवक होत असून, लाल कांद्याला किमान २००० रुपये कमाल ४६४७ तर सरासरी ४००० रुपये इतका भाव मिळत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २ हजार रुपयांनी लाल कांद्याच्या दारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे आहे.

उन्हाळ कांद्याचे दर वाढण्यास सुरुवात होत असताना केंद्र सरकारने तातडीने हालचाली करून वेगवेगळ्या उपाययोजना करून कांद्याचे दर पाहिजे तितके वाढून दिले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या कांदा पिका च्या धोरणाबाबत नाराजी असल्याचे चित्र होते. मात्र गतवर्षीच्या तुलनेत लाल कांद्याला यंदा चांगला बाजारभाव मिळत आहे. हा बाजार भाव टिकून राहावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

निर्यात मूल्य शुल्क कमी होणे गरजेचे

अत्यंत कमी व मुबलक पाण्यात शेतकऱ्यांनी कमी पर्जन्यमान असताना लाल कांदा पिकवलेला आहे. सध्या ती लाल कांद्यातून शेतकऱ्यांना जरी पैसा मिळत असला तरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेले असल्याने शेतकऱ्यांना त्यातून खूप मोठे काही उत्पन्न मिळणार नाही. कमी पावसामुळे ज्या ठिकाणी दोन ट्रॅक्टर कांदा पाहिजे तेथे अर्धा ट्रॅक्टर कांदा निघालेला आहे. अशी परिस्थिती आहे त्यामुळे केंद्र सरकारने आता तरी कांदा निर्यात मूल्य कमी करून लाल कांदा उत्पादकांना आधार देण्याची गरज आहे.

- मनोज जैन, कांदा निर्यातदार ,लासलगाव

निसर्गाचा असमतोल कांदा उत्पादकांसाठी डोकेदुखी

कधी कधी खूप जास्त पाऊस होतो, त्यात लागवड केलेला कांदा अक्षरशः सडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर कधीकधी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असते त्यात कांदा व्यवस्थित तयार होत नाही त्यामुळे निसर्गाचा असमतोल कांदा उत्पादकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीत आणत आहे त्यातच केंद्र सरकारचे कांदा पिकाबाबतचे धोरण व्यवस्थित नसल्याने कांदा उत्पादकांना नेहमीच संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे शेतकरी राजा बाबा होळकर यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षातील आवक व बाजारभाव ( नोव्हेंबर महिना)

वर्ष आवक (क्विंटलमध्ये) बाजार भाव

२०१९. १२९६४. ११००-७१११-४४००

२०२०. ९४८०. ७००-५१०१-३४६८

२०२१. १३८०८. ६००-३४९९-२१६०

२०२२. १५२. ५००-३६०१-२०५८

२०२३ (२२) ४९००. २०००-४६४७-४०५०

logo
marathi.freepressjournal.in