पळसवाडीला सेवा रोड केला जाणार ; ग्रामस्थांच्या उपोषणानंतर प्रशासन लागले कामाला

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले यांनी रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
पळसवाडीला सेवा रोड केला जाणार ; ग्रामस्थांच्या उपोषणानंतर प्रशासन लागले कामाला

छत्रपती संभाजीनगर : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पळसवाडी गावातून उड्डाणपूल गेलेला आहे. शेजारी सर्व्हिस रोड तयार करण्यात यावा, या मागणीसाठी पळसवाडी ग्रामस्थांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला यश आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले यांनी रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले यांची पळसवाडी ग्रामस्थांसोबत भेट घेतली. राष्ट्रीय महामार्ग क्र.५२ पळसवाडी गावातून गेला असून गावात येण्या-जाण्याकरिता सर्व्हिस रोड न केल्याने गावातून बाहेरगावी किंवा शेती कामा जाण्यास रस्ता नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे इंगोले यांच्या निदर्शनास आणून देत त्वरित सदरील प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली. ही समस्या दूर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. दररोज ग्रामस्थांना या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने ते वैतागले आहेत. पावसाळयात तर ग्रामस्थांचे येथून जाताना हाल झाले यामुळे त्यांनी उपोषण केले. रवींद्र इंगोले यांनी ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत येत्या आठ दिवसांत सदरील उड्डाणपूल, शेजारी सर्व्हिस रोड तयार करून देण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी पळसवाडीचे सरपंच दगडू भेंडे, उपसरपंच सोमनाथ ठेंगडे, माजी उपसभापती युवराज पाटील, शेतकरी शेतमजूर पंचायत जिल्हा अध्यक्ष कासमभाई, माजी उपसरपंच सुधाकर दहीवाऴ, ग्रामपंचायत सदस्य सीताराम पवार, आम आदमी पक्षाचे खुलताबाद तालुका युवाध्यक्ष किशोर जाधव, किशोर ठेंगडे, देविदास मसरूप, सीताराम पवार, नंदु ठेंगडे, सुनील औटे, सोपान काळे, सचिन कोरडे, उमेश सातदिवे, किरण सातदिवे आदींची उपस्थिती होती.

logo
marathi.freepressjournal.in