बहिणीचे प्रेम विकले जाणारे नाही; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

विधानसभा निवडणूक ही यश - अपयशाची लढाई नाही, तर तत्त्वांची लढाई आहे. पंधराशे रुपयात विकले जाईल असे बहिणीचे प्रेम नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावला.
बहिणीचे प्रेम विकले जाणारे नाही; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : विधानसभा निवडणूक ही यश - अपयशाची लढाई नाही, तर तत्त्वांची लढाई आहे. पंधराशे रुपयात विकले जाईल असे बहिणीचे प्रेम नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावला.

लोकसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने आपल्याला खूपच मदत केली, त्यामुळे या दोन्ही पक्षांचे आपण आभार मानतो, असेही त्या म्हणाल्या.

दिल्लीतील वातावरण बदलले, तसे महाराष्ट्रातील वातावरणही आता बदलणे गरजेचे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट कोणालाही द्या, मात्र विजय मविआचाच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सुळे म्हणाल्या की, भाजपचे आमदार रवी राणा यांनी, विधानसभा निवडणुकीत मतदान केले नाही तर बहिणीकडून पैसे परत घेण्याचे वक्तव्य केले. त्यांच्या मनातीलच ओठावर आले आहे. राज्यात सध्या गलिच्छ राजकारण सुरू असून भ्रष्ट महायुती सरकारला तिची योग्य ती जागा दाखवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांने महाविकास आघाडी म्हणजे आपलेचच सरकार हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीच्या कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित काऱ्यकर्त्यांना केले.

logo
marathi.freepressjournal.in