डोंबिवलीमध्ये संजय राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे व 40 आमदारांबाबत जाहीरपणे केलेल्या वक्तव्यावर शिंदे समर्थकांनी राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला
डोंबिवलीमध्ये संजय राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदेंसह यांच्यासह ४० आमदारांनी काही दिवस गुवाहाटीत मुक्काम करत आहेत. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे व 40 आमदारांबाबत जाहीरपणे केलेल्या वक्तव्यावर शिंदे समर्थकांनी राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.

डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कलवर शिंदे समर्थकांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी शिंदे समर्थक योगेश जुईकर, सुजित नलावडे, हनुमान ठोंबरे यांसह अनेक जणांनी निषेध व्यक्त केला. यावेळी सुजित नलावडे म्हणाले शिंदे व 40 आमदारांबाबत संजय राऊत यांनी जाहीरपणे जे वक्तव्य केले त्याचा निषेध करतो. विधानसभेतील सदस्यांबाबत अशा पद्धतीने बोलण्याचा अधिकार राऊत यांना नाही.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in