सोलापूरात भीषण अपघात! अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याने 4 जणांचा मृत्यू

या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सोलापूरात भीषण अपघात! अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याने 4 जणांचा मृत्यू

राज्यात अपघातांचं प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज (२३ ऑगस्ट) सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याच्या यावली जवळ एक भीषण अपघात झाला. या अपघातात एका अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याने तीन जणांचा जागीचं मृत्यू झाला आहे. तर एकाची उपचारादरम्यान प्राणज्योत मालावली. अन्य सहा प्रवासी देखील या अपघातात गंभीर जखमी झालेआहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आज पहाटेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याने हा भीषण अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. हे सर्वजण अहमदनगरहून सोलापूरला जात होते. त्याच वेळी हा अपघात झाला. अपघातामध्ये झालेल्या जखमींवर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

logo
marathi.freepressjournal.in