मुरूड-जंजिरा : काशीद समुद्रकिनारी पुणे येथून आलेल्या पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
पुण्यातून १६ जणांचा समूह काशीदला फिरायला आला होता. रविवारी सकाळी ते काशीद समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यास गेले होते. फिरता फिरता यातील काहीजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. यातील चिंचवड येथील रोनक रेसिडेन्सीमधील मुद्दसर इम्तियाज शेख (वय ३७) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन आठवड्यांत पुणे येथील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.