नांदेड रेल्वे स्थानकातील ट्रेनने अचानक पेट घेतला; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर 30 मिनिटांतच आग पूर्णपणे आटोक्यात आली आणि इतर कोणत्याही डब्याचे नुकसान झाले नाही, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
नांदेड रेल्वे स्थानकातील ट्रेनने अचानक पेट घेतला; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
Published on

नांदेडच्या रेल्वेस्थानकावर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या रेल्वेच्या एका डब्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी 10 वाजता घडली. सुदैवाने दुरुस्तीसाठी राखीव असलेल्या मेंटेनन्स यार्ड येथे ही ट्रेन उभी असल्याने ट्रेनमध्ये प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठी दूर्घटना टळली.

सर्वप्रथम रेल्वेच्या एका डब्याला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. धूर आणि आग निदर्शनास येताच तिथे उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवली. रेल्वेच्या दुरुस्ती आणि वॉशिंगसाठी याच ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध असल्याने काही कर्मचाऱ्यांनी त्याच पाईपच्या मदतीने पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळविले आणि हा डबा बाजूला करण्यात आला. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर 30 मिनिटांतच आग पूर्णपणे आटोक्यात आली आणि इतर कोणत्याही डब्याचे नुकसान झाले नाही, अशी माहिती रेल्वेने दिली आहे. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

logo
marathi.freepressjournal.in