पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने अयोध्येतील राम लल्ला मूर्ती प्रतिष्ठापणेच्या निमित्ताने तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २१ ते २३ जानेवारी या कलावधीत या कार्यक्रमांचा पुणेकरांना लाभ घेता येणार आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी या कार्यक्रमांची माहिती दिली. अयोध्येत श्री. प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर उभे रहात आहे. या मंदिरात रामलल्ला मुर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या सोमवारी होणार आहे. त्यानिमित्ताने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरातही श्री प्रभू रामाची व गणपतीची आरती, महाआरती, भजन, रामरक्षा पठण, दीपोत्सव अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणेकरांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्ट तर्फे श्री. पुनीत बालन यांनी केले आहे.
अयोध्येत होत असलेला रामलल्ला प्रतिष्ठापणेचा सोहळा ऐतिहासिक असणार आहे. करोडो देशवासियांचे स्वप्प्न साकार होत आहे. यानिमित्ताने श्रीमंत भाउसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून पुढील तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
- पुनीत बालन, उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट