धक्कादायक! एका हाती स्टिअरींग दुसऱ्या हाती मोबाईल, एसटीतील प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरुच; व्हिडिओ व्हायरल

ही बस बुलडाणा आगाराची असून ती अजिठ्यांच्या दिशेने जात असल्याचं व्हायरल व्हिडिओतून दिसत आहे.
धक्कादायक! एका हाती स्टिअरींग दुसऱ्या हाती मोबाईल, एसटीतील प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरुच; व्हिडिओ व्हायरल

बुलडाण्याहून अजिंठ्याकडे जाणाऱ्या बुलडाणा आगाराच्या बसचा एका धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतं आहे. या व्हायरल व्हिडिओत चालकाच्या एका हाती मोबईल आणि दुसऱ्या हाती स्टिअरींग दिसून येत आहे. चालक हा मोबाईल बघत निष्काळजीपणाने वाहन चालवताना दिसत आहे. बसमधील एका प्रवाशाने हा व्हिडिओ काढल्याचं दिसत आहे.यात रात्रीचा वेळ असून चालक मोबाईल बघत बस चालवत असून समोरुन वेगाने येणारी वाहनं देखील या व्हिडिओत दिसत आहेत. याच बरोबर या व्हिडिओत बसचा क्रमांक आणि काही प्रवासी देखील दिसून येत आहेत.तसंच ही बस बुलडाणा आगाराची असून ती अजिठ्यांच्या दिशेने जात असल्याचं देखील बसमध्ये लागलेल्या पाटीवरुन दिसत आहे.या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

मोबाईल पाहताना एसटी महामंडळाची बस चालवितानाचा चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. चालकाकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा प्रकार या व्हिडिओतून समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्या ऐरणीवर आला आहे. हा व्हिडिओ समाज माध्यामांवर व्हायरल झाल्यानंतर एसटी महामंडळ आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका बस चालकाचा मोबाईलवर व्हिडिओ बघत बस चालवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.आता रात्रीच्या प्रवासात पुन्हा एकादा प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओमुळे नेटकरी संताप व्यक्त करत असून कारवाईची मागणी होत आहे. याप्रकरणी महामंडळ काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in