तरुणीने लग्नासाठी तगादा लावल्याने युवकाची आत्महत्या

साताऱ्यातील माण तालुक्यातील वावरहिरे येथील घटना एका अल्पवयीन मुलीचे त्याच गावातील प्रेम बसलेल्या मुलाकडे लग्न करण्याचा हट्ट धरत त्याला त्रास देणे सुरू केल्याने हे प्रकरण त्याच्या जीवावर बेतले
A young man commits suicide as a young woman insists on marriage
प्रातिनिधिक प्रतिमा

कराड : साताऱ्यातील माण तालुक्यातील वावरहिरे येथील घटना एका अल्पवयीन मुलीचे त्याच गावातील प्रेम बसलेल्या मुलाकडे लग्न करण्याचा हट्ट धरत त्याला त्रास देणे सुरू केल्याने हे प्रकरण त्याच्या जीवावर बेतले अन‌् मुलाने आपल्याच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजता घडली. मात्र याबाबतचा गुन्हा बुधवारी मध्यरात्री १२ वा दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

बापू जक्कल काळे (१८ ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून सदर अल्पवयीन मुलीविरुद्ध मृत युवकाची आई कविता जक्कल काळे (३७) यांनी मुलास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दहिवडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे या अधिक तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in