भावाच्या मित्राला आत्महत्येपासून रोखताना तरुणाने गमावले प्राण

जखमी झालेल्या शुभमला रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
भावाच्या मित्राला आत्महत्येपासून रोखताना तरुणाने गमावले प्राण

नागपूर : आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या भावाच्या मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात एका २५ वर्षीय तरुणाला मात्र प्राण गमवावे लागल्याची घटना नागपूर येथे हुडकेश्वर भागात गुरुवारी घडली.

रोहित ज्ञानेश्वर खारवे (२७) हा तरुण हुडकेश्वर येथे आपला मित्र मनीष प्रमोद करवाडे याच्या घरी राहत आहे. मनीष याची आई व भाऊ शुभम हेही तेथे राहतात. रोहित आपली धाकटी बहीण सात वर्षांपासून बेपत्ता असल्याने नाराज होता व त्यामुळे गुरुवारी त्याने भावनेच्या भरात स्वत:ला दोष देत व बहिणीला शोधू न शकल्याने हताश होऊन त्याने स्वयंपाकघरातील चाकू घेऊन स्वत:ला भोसकून घेण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली. तेव्हा मनीष त्याला थांबविण्याचा प्रयत्न करत असताना त्याने त्याला ढकलून दिले. त्यामुळे मनीष भिंतीवर आपटला गेला व तो जखमी झाला. यात मनीषचा भाऊ शुभम याने रोहितच्या हातून चाकू खेचून त्याला रोखण्याचा प्रयत्न सुरू केला, पण त्यावेळी दुर्दैवाने त्या चाकूने रोहितच्या हातून शुभम भोसकला गेल्याने तो जबर जखमी झाला.

जखमी झालेल्या शुभमला रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मनीषच्या जबाबावरून हुडकेश्वर पोलिसांनी शनिवारी रोहितला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक चौकशी चालू आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in