TET Scam : अब्दुल सत्तार TET साठी अडकणार ईडीच्या जाळ्यात ? मुलांची नावे समोर

आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई झाली पाहिजे. नसेल तर ज्यांनी हे सर्व केले त्यांना फाशी द्या
Twitter/@AbdulSattar_99
Twitter/@AbdulSattar_99

सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी (TET Scam) घोटाळ्यात माजी मंत्री आणि आता शिंदे गटाचे मोठे नेते अब्दुल सत्तार हे चांगलेच गोत्यात सापडण्याची चिन्ह आहेत. या घोटाळ्यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलामुलींचे नाव यामध्ये समोर येत आहे. याविषयी बोलताना सत्तार म्हणाले की, आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई झाली पाहिजे. नसेल तर ज्यांनी हे सर्व केले त्यांना फाशी द्या.

या प्रकरणाची योग्य चौकशी झाली पाहिजे. कोणीही कोणाची बदनामी करू नये. चुकीची माहिती देऊन बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी, असेही सत्तार यांनी म्हटले आहे.

हीना सत्तार, उजमा सत्तार, हुमा फरहीन सत्तार, आमेर सत्तार अशी सत्तार यांच्या मुलांची नावे आहेत. टीईटी घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे जाण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी म्हाडा, आरोग्य आणि टीईटी परीक्षेतील घोटाळा उघडकीस आणला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटकही केली होती. या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रे ईडीने पुणे पोलिसांकडून तपासासाठी मिळवली आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी ही सर्व कागदपत्रे ईडीकडे सोपवली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in