Abdul Sattar : 'सॉरी म्हणतो आणि शब्द मागे घेतो, पण...' ; राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर काय म्हणाले अब्दुल सत्तार?

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तर (Abdul Sattar) यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर माफी मागितली.
Abdul Sattar : 'सॉरी म्हणतो आणि शब्द मागे घेतो, पण...' ; राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर काय म्हणाले अब्दुल सत्तार?

महाराष्ट्राचे कृषिमंत्री अब्दुल सत्तर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आणि संपूर्ण महाराष्ट्रात रणकंदन माजले. महाराष्ट्रभरातून अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आंदोलने करण्यात आली. त्यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी यावर माफी मागताना म्हंटले की, "मी कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीत अपशब्द बोललो नाही. तरीही जर माझ्या बोलण्याने कोणाची मते दुखावली असतील तर मी स्वारी म्हणतो आणि माझे शब्द मागे घेतो."

पुढे त्यांनी म्हंटले की, "आम्हाला जे बदनाम करत आहेत, मी त्यांच्याबद्दल बोललो आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल किंवा कुठल्याही महिलेबद्दल मी काहीच बोललेलो नाही. महिलांची मने दुखावतील असा कोणताच शब्द बोललो नाही. परंतु, माझ्या बोलण्याने जर कोणाचीही मने दुखावली असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो. मी जे बोललो ते फक्त खोक्यांच्याबद्दल बोललो. परंतु, त्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये. मी महिलांचा सन्मान करणारा नेता आहे. मी कोणत्याही महिलेच्या विरोधात बोललो नाही."

logo
marathi.freepressjournal.in