काय ? अब्दुल सत्तार शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाणार नाही

आता सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व आमदार पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या चरणी जाणार आहेत. मात्र आता राज्यात एक वेगळीच चर्चा रंगतेय ती म्हणजे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार
काय ? अब्दुल सत्तार शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाणार नाही

राज्यातील सत्ता नाट्य घडून आता बरेच महिने उलटले मात्र त्यामधील घडामोडी या रोज तितक्याच नवीन असतात. गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन नवस करण्याचा प्रताप संपूर्ण राज्याने पाहिला... आता सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व आमदार पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या चरणी जाणार आहेत. मात्र आता राज्यात एक वेगळीच चर्चा रंगतेय ती म्हणजे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाणार नाही आहेत. ते नाराज आहेत अशी चर्चा सगळीकडे रंगत असतानाच त्यांनी या बाबतीत पत्रकार परिषद घेऊन चर्चाना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. 

काय म्हणाले अब्दुल सत्तार ? 

एकनाथ शिंदे आणि माझ्यामध्ये कोणताही दुरावा नाही. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. मी इथे माझी काही कामे असल्याकारणाने थांबत आहे. मी सर्वधर्म मानतो. कामाख्या देवीच्या दर्शनाला मी नंतर पण जाऊ शकतो. आजच गेलो तरच देवी पावेल असा काही नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in