
कराड : अल्पवयीन मुलीस तिचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावरती सातत्याने अत्याचार करणाऱ्या आरोपीस कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश के. एस. होरे यांनी २० वर्षांचा कारावास आणि दोन लाख ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
संगम संभाजी डुबल (२८) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे,अशी माहिती येथील सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी दिली. अल्पवयीन मुलीची सोशल मीडियावर संगम डुबल याच्याशी ओळख झाली होती. अल्पवयीन मुलीस तिचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत संगम संभाजी डुबल याने मुलीवर सातत्याने अत्याचार केला होता. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलीने याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली. कराड शहर पोलीस ठाण्यात आरोपी संगम डुबल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.