'बामू'त आंबेडकरवादी आणि अभाविप आमने-सामने ; विद्यापीठाचे विद्रुपीकरण केल्याचा ABVPच्या कार्यकर्त्यांवर आरोप

ABVP च्या विद्यार्थ्यांच्या अटकेसाठी बुधवारी विद्यापीठ बंदची हाक देण्यात आली आहे.
'बामू'त आंबेडकरवादी आणि अभाविप आमने-सामने ; विद्यापीठाचे विद्रुपीकरण केल्याचा ABVPच्या कार्यकर्त्यांवर आरोप
Published on

छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी संघटनांचे राजकारय़ण तापण्याची शक्यता आहे. आक्षेपार्ह भिंतीलेखन केल्याच्या मुद्यावरुन आज विद्यापीठात राडा झाला. दरम्यान, आंबेडकरवादी तरुणींनी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस विद्यापीठ परिसरात दाखल झाले आहेत. ABVP च्या विद्यार्थ्यांच्या अटकेसाठी बुधवारी विद्यापीठ बंदची हाक देण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील विद्यार्थी संघटना आपल्या प्रचारासाठी भिंतलेखन, पोस्टर अशा विविध मार्गांचा अवलंब करतात. ABVP च्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी join ABVP असं लिहिलं होतं. मात्र हे सर्व करत असताना परिसरात विद्रुपीकरण करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला. अभाविच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव Join ABVP असं लिहिण्यात आलं. त्यावरुन काही विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या. महापुरुषांच्या नावावर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या संघटनेचं नाव लिहिलं असल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरुन वातावरण चांगलचं पेटलं. दरम्यान, आज आंबेडकरवादी तरुणांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना याबाबत जाव विचारत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विद्यापीठ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्रुपीकर करणाऱ्या ABVP च्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी उद्या (१८ ऑक्टोबर) रोजी विद्यापीठ परिसरात बंदची हाक देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या कँम्पसमधील सर्व पुरोगामी संघटनांनी उद्या विद्यापीठ बंदची हाक दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in