ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद

मुंबईतील ठाकरे गटाचे माजी माजी नगरसेवक यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याने केली गुन्ह्याची नोंद
ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद
Published on

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमविल्याचा आरोप लावण्यात आला आहे. योगेश भोईर हे समता नगर प्रभाग २४ येथील माजी नगरसेवक आहेत. त्यांच्यावर गुन्हा दखल केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, विरोधकांनी अनेकदा त्यांच्यावर होत असलेल्या कारवायांवरून भाजपविरोधात टीका केली आहे.

योगेश भोईर हे समता नगर प्रभाग २४चे माजी नगरसेवक असून त्यांनी ८५ लाखांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर नगरसेवक पदाच्या कालावधीत उत्पन्नापेक्षा ८५ लाख ५६ हजार ५६२ रुपये अधिक मालमत्ता जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एसीबीने शोध मोहिम राबवली होती.

logo
marathi.freepressjournal.in