ठाकरे गटाच्या या नेत्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी

ठाकरे गटाचे आमदार असलेले नेत्याची मालमत्तेची चौकशी करण्यासाठी ही नोटीस बजावली
ठाकरे गटाच्या या नेत्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने नोटीस बजावली. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी ही नोटीस बजावली असल्याची माहिती देण्यात आली. त्यांना ५ डिसेंबरपर्यंत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती, मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही असे जाहीर केले होते.

उपनेते राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हणाले की, "मला एसीबीने चौकशीची नोटीस पाठवली आहे. मी निर्दोष आहे. मी चौकशीला सामोरे जाणार कारण मी स्वच्छ आहे. अशा धमक्यांना भीक घालत नाही. हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा आणि तुरुंगात टाका. हिंमत असेल तर मला अटक करा. मी घाबरत नाही. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना तसेच ही जनता माझ्या पाठीशी आहे. जेलमध्ये जाईन, पण मी शरण जाणार नाही," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. "हो मी श्रीमंत आहे. माझी श्रीमंती ही बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या पाठीवर मारलेली थाप आहे. माझे शिवसैनिक ही माझी संपत्ती आणि श्रीमंती आहे. वडापाव खाऊन आम्ही जिल्ह्यातील शिवसेना वाढवली ही चूक केली का?"असा प्रश्न त्यांनी विचारला.

logo
marathi.freepressjournal.in