जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य? थोड्याच वेळात घेणार जाहीर सभा, काय भूमिका घेतात याकडे लक्ष

काही वेळात वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांची सभा होईल. यावेळी ते काय भूमिका मांडतात हे महत्त्वाचं ठरणार आहे.
जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य? थोड्याच वेळात घेणार जाहीर सभा, काय भूमिका घेतात याकडे लक्ष

मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा लढा आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. सरकारच्या शिष्टमंडळाने आज जरांगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत आता जरांगे पाटील सरकारने दिलेला जीआर वाचून दाखविणार आहेत. सध्या नवी मुंबईतल्या वाशी या ठिकाणी हा मोर्चा आहे. एपीएमसी मार्केटमध्ये मराठा आंदोलक जमले आहे. काही वेळात वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांची सभा होईल. यावेळी ते काय भूमिका मांडतात हे महत्त्वाचं ठरणार आहे.

"आपल्याला काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करायची आहे. सरकारने काही कागदपत्रे दिली आहेत, ते वाचून दाखवणार आहे. झालेल्या घटना तुम्हाला सांगायच्या आहेत. आता आपण मोकळं माघारी जाणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान साऊंड सिस्टीमच्या व्यवस्था करण्यात येत आहे. त्यांनंतर जरांगे पाटील सभा घेणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in