राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य, आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करून सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य, आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा

मुंबई : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करून सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

वित्त विभागाच्या १ एप्रिल २०१० च्या शासन निर्णयानुसार सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेत १ ऑक्टोबर २००६ पासून लाभ देतांना या कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतनसंरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याचे व त्याअनुषंगाने शासन निर्णयात सुधारणा करण्यात येईल.

या बरोबरच मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार तीन लाभाच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती सेवा योजनेत १ जानेवारी २०१६ पासून लाभ देतांना या कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याचे व त्या अनुषंगाने शासन निर्णयात सुधारणा करण्यात येईल. या निर्णयामुळे अंदाजे २२ कोटी ७९ लाख ९ हजार ११६ इतका अनावर्ती खर्च आणि अंदाजे ३ कोटी ६१ लाख ९२ हजार इतका वार्षिक आवर्ती खर्च येईल.

logo
marathi.freepressjournal.in