Accident: जरांगेंच्या सभेसाठी देणगी घेऊन जाणाऱ्या युवकाच्या दुचाकीला भीषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू

नांदेड जिल्ह्यात 6 डिसेंबर माहुर येथे बळीराजा चौक लांजी बायपास रोड येथे दुपारी 12 वाजता भव्य जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
Accident: जरांगेंच्या सभेसाठी देणगी घेऊन जाणाऱ्या युवकाच्या दुचाकीला भीषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू

नांदेड जिल्ह्यात झालेल्या अपघतात एका 45 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या कंधार येथील सभेसाठी चोंडी तालुक्यातील स्वयंसेवकांची यादी आणि गावातून जमा झालेली देणगी घेऊन हा युवक कंधारकडे निघाला होता. याचवेळी समोरून येणाऱ्या मोटर सायकलची आमनेसामने जोराची धडक झाली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. बालाजी नारायण जाधव असं मयत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांची कंधार येथे 8 डिसेंबर रोजी सभा होत आहे. या सभेसाठी लोहा तालुक्यातील चोंडी या गावातून मराठा समाज बांधवांकडून काही जमा झालेली देणगी आणि सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या स्वयंसेवकांची यादी घेऊन बालाजी नारायण जाधव हे कंधार येथे जात होते.

दरम्यान, कंधार तालुक्यातील बाळंतवाडी या गावाजवळ आल्यानंतर समोरून येणाऱ्या मोटर सायकलची समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा मोठा होता की, मोटारसायकलचा चकनाचूर झाला आहे. या भीषण अपघातामध्ये बालाजी नारायण जाधव यांचा जागेवरचं मृत्यू झाला आहे. तर गुलाब लक्ष्मण गीते (वय 27, रा. नागदरवाडी, ता. लोहा) हा युवक जखमी झाला आहे. गुलाब गीते यास कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडून महाराष्ट्राचा दौरा केला जात आहे. दरम्यान, त्यांच्या याच चौथ्या टप्यातील दौऱ्यात नांदेड जिल्ह्यात एकूण पाच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या सभा होणार आहेत. ज्यात नांदेड जिल्ह्यात 6 डिसेंबर माहुर येथे बळीराजा चौक लांजी बायपास रोड येथे दुपारी 12 वाजता भव्य जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in