Video - पुणे : कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन् बससह 4 गाड्या एकमेकांवर धडकल्या; कात्रजच्या बोगद्यात विचित्र अपघात

या अपघातामुळे याठिकाणी अर्धातास वाहतूककोंडी निर्माण झाली होती.
Video - पुणे : कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन् बससह 4 गाड्या एकमेकांवर धडकल्या; कात्रजच्या बोगद्यात विचित्र अपघात

मुंबई-बंगळुरु बाह्यमार्गावरील कात्रजच्या नवीन बोगद्यात आज एक विचित्र अपघात घडला. बोगद्याच्या आत दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यादरम्यान, साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने अचानक ब्रेक मारला. यामुळे पाठीमागे असलेली वाहने एकमेकांवर आदळली. यात एका बसचा देखील समावेश होता. या अपघातात एक महिला जखमी झाली असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातामुळे याठिकाणी अर्धातास वाहतूककोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसेंसह इतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in