

छत्रपती संभाजीनगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील भाविकांच्या कारला उज्जैनच्या महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जात असताना कन्नड घाटात अपघात झाला. या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शेवगाव येथील सात मित्र कारने उज्जैनकडे जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार वेगात घाटाच्या संरक्षण कठड्याला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा चेंदामेंदा झाला. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिक आणि चाळीसगाव ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.