हिंगोली गेट परिसरातील खून, लूट प्रकरणातील आरोपींना अटक

हिंगोली गेट परिसरातील खून व लूट प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
हिंगोली गेट परिसरातील खून, लूट प्रकरणातील आरोपींना अटक

नांदेड : हिंगोली गेट परिसरातील खून व लूट प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली आहे. हिंगोली गेट परिसरातील फटाका मैदानामध्ये दि. ५ जानेवारीला रात्री विकास यशवंत राऊत याचेवर अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने वार करून, त्याचा निघून खुन केला होता. सदर प्रकरणी वजिराबाद ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेऊन अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना दिल्या होत्या. त्यांनी पथके तयार करुन आरोपीतांना अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. दि.२३ रोजी पोलीस उपनिरिक्षक ए. एम. बिचेवार व डी. एन. काळे त्यांचे सोबत असलेल्या अंमलदारासह नांदेड शहरात आरोपी शोध कामी पेट्रोलींग करीत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संशयित आरोपी भारतसिंघ धारासिंघ बावरी (३५) याला ताब्यात घेतले. विचारपुस केली असता, त्याने व त्याचा एक साथीदार या दोघांनी मिळुन विकास यशवंत राऊत याचा खुन केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या गुन्हयातील संशयित आरोपी जसविंदरसिंघ ऊर्फ जस्सी स्वरुपसिंघ रामगडीया याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदरचा गुन्हा हा त्याने व त्याचा साथीदार संशयित भारतसिंघ धारासिंघ बावरी व इतर एक साथीदार यांनी मिळुन केल्याचे सांगितले. वर दोन्ही गुन्हयातील मोबाईल हे वाळुज येथील राहुल रवी मोटे याचेकडे मिळुन आले. १७ हजार रूपये किंमतीचे दोन्ही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. संशयित आरोपीला पुढील तपासासाठी वजीराबाद पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in