कराडला कोठडीतील संशयित गंभीर जखमी

आरोपीने कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
कराडला कोठडीतील संशयित गंभीर जखमी
Published on

कराड : एका दरोडा प्रकरणातील संशयिताने येथील कराड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीतच स्वत:वर शस्त्राने वार करून घेत भिंतीवर डोके आपटून ते फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत कराड शहर पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली होती. मात्र, याबाबतचे बिंग फुटल्याने अखेर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. सोनू ऊर्फ संजीव कपूरसिंग टाक (वय २८, रा.हडपसर, गाडीतळ,पुणे) असे संबंधित संशयिताचे नाव असून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, संशयिताने स्वत:वर शस्त्राने वार करून घेतले असतील तर त्याच्याकडे शस्त्र आले कोठून?कोणी आणून दिले? त्यावेळी पोलिसांच्या लक्षात सदर बाबा का आली नाही ? आदी प्रश्न उपस्थित होत असून एकूणच या संपूर्ण घटनेची कसून चौकशी होण्याची मागणी होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in