आचार्य देवव्रत यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ; मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी राजभवनात दिली शपथ

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी संस्कृतमधून महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. श्री चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली.
आचार्य देवव्रत यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ; मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी राजभवनात दिली शपथ
Photo : X (@ADevvrat)
Published on

मुंबई : गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी संस्कृतमधून महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. श्री चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली.

आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल ठरले आहेत. सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपालपद रिक्त होते. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल देवव्रत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या शपथविधी सोहळ्याला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲॅड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास, उद्योजकता, रोजगार व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, क्रीडा मंत्री ॲॅड. माणिकराव कोकाटे, मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव (राजशिष्टाचार) मनीषा म्हैसकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्य सचिव राजेशकुमार यांनी देवव्रत यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. शपथविधीनंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.

राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार

  • नाव : आचार्य देवव्रत, राज्यपाल, गुजरात

  • वडिलांचे नाव : लहरी सिंह

  • जन्म : १८ जानेवारी १९५९

  • शैक्षणिक पात्रता : पदवीधर, पदव्युत्तर (इतिहास आणि हिंदी), बी.एड.

  • योगशास्त्रातील डिप्लोमा : नैसर्गिक चिकित्साशास्त्र व योगिक सायन्समध्ये डॉक्टरेट

अध्यापन व प्रशासन क्षेत्रात ४५ वर्षांचा अनुभव

  • १२ ऑगस्ट २०१५ ते २१ जुलै २०१९ या काळात हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून कार्य.

  • या कालावधीत नैसर्गिक शेती, गोसंवर्धन, "बेटी बचाओ-बेटी पढाओ", सामाजिक ऐक्य, व्यसनमुक्ती, वृक्षलागवड व जलसंवर्धन अशा कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली.

  • २२ जुलै २०१९ पासून गुजरातचे राज्यपाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात तसेच इतर राज्यांमध्ये नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणात प्रसार. गुजरातमध्येच ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी रासायनिक शेती सोडून नैसर्गिक शेतीचा स्वीकार केला.

  • १५ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.

logo
marathi.freepressjournal.in