गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

या कारवाईत पोलिसांनी तीनही वाहनांमधील एकूण २९ गुरांची सुटका केली. संशयित आरोपींकडून एकूण १६ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

नागपूर : गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर नागपूर पोलिसांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन छोट्या वाहनांसह दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीनही वाहनांमधील एकूण २९ गुरांची सुटका केली. संशयित आरोपींकडून एकूण १६ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अब्दुल शाहिद अब्दुल रफिक (२४, रा. मोमीनपुरा, नागपूर) आणि जाहीर खान बब्बू खान (३४, रा. कामगार नगर, नवीन कामठी) अशी संशयितांची नावे आहेत. हे दोघे वाहनचालक आहे तर यांच्यातील एक संशयित आरोपी पळून गेला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कामठी शहरातून गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कामठी (जुनी) पोलिसांच्या पथकाने संशयित वाहनांची अडवणूक करून पाहणी केली. दरम्यान, शहरातील कमसरी बाजार परिसरात वाहने अडवून झडती घेतली असता, त्यातील दोन वाहनांमध्ये प्रत्येकी १० प्रमाणे २० आणि तिसऱ्या वाहनामध्ये ९, अशी एकूण २९ गुरे कोंबल्याचे आढळून आले. चौकशी दरम्यान यातील सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी दोन वाहनांच्या चालकांना अटक केली. तर एकाला पळून जाण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून तीन वाहने आणि २९ जनावरे असा एकूण १६ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कामठी (जुनी) पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in