चंद्राकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्या भीम आर्मीच्या शहरअध्यक्षावर तडीपारीची कारवाई; पोलिसांचं कडं तोडून फेकली होती शाही

१५ ऑक्टोबर रोजी सात रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात प्रचंड पोलीस बंदोबस्त असताना चंद्राकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला होता.
चंद्राकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्या भीम आर्मीच्या शहरअध्यक्षावर तडीपारीची कारवाई; पोलिसांचं कडं तोडून फेकली होती शाही

सोलापूरचे पालमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या भीम आर्मीच्या शहराध्यक्षावर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. त्यांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे. १५ ऑक्टोबर रोजी सात रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात प्रचंड पोलीस बंदोबस्त असताना चंद्राकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला होता.

सोलापूरच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदा सोलापूरात आले होते. यापू्र्वी सप्टेंबर महिन्यात धनगर आरक्षणाच्या मुद्यावरुन एका तरुणाने तत्कालीन पालमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला होता. यामुळे सोलापुरात येणाऱ्या प्रत्येक मंत्र्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त दैनात करण्यात आला होता.

दरम्यान, चंद्राकांत पाटील यांची सोलापुरच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर ते सोलापूर येथे आले होते. यावेळी त्यांच्याभोवती पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या समक्ष पोलिसांचा बंदोबस्त असताना भीम आर्मी संघटनेचे शहराध्यक्ष अजय उर्फ रावण संतोष मैंदर्गीकर यांनी पोलिसांचं कडं तोडून पालकमंत्र्यांच्या अंगावर शाईफेक करुन काळा झेंडा दाखविला होता. शाककीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण रद्द करण्याची मागणी करत मैंदर्गीकर यांनी हे कृत केले होते. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथडा आणल्याच्या आरोपाखाली दखलपात्र गुन्हा दाखल केली होती. संतोष मैंदर्गीक हे तब्बल २६ दिवस अटकेत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in