अमित ठाकरेंची कार अडवल्याने कार्यकर्ते संतापले ; टोलनाक्याची केली तोडफोड

फास्ट टॅगच्या तांत्रिक बिघाडामुळे विलंब झाल्याचं सांगण्यात आलं. या घटनेनंतर अमित ठाकरे तेथून निघून गेले. त्यानंतर...
अमित ठाकरेंची कार अडवल्याने कार्यकर्ते संतापले ; टोलनाक्याची केली तोडफोड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमित ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी अमित ठाकरे हे सिन्नरवरुन मुंबईच्या दिशेने जात असताना सिन्नरजवळ समृद्धी महामार्गावर टोलनाका कर्मचाऱ्यांनी त्यांची कार अडवली. यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला आहे. अमित ठाकेर हे गेल्यानंतर हा प्रकार घडला आहे.

मागील तीन दिवसांपासून अमित ठाकरे हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून नंदूरबार, जळगांव, धुळे या ठिकाणी त्यांनी मेळावे घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यानंतर ते शनिवारी रात्रीच्या सुमारास सिन्नरजवळील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर त्यांची कार अडवण्यात आली. यामुळे त्यांना काही काळ अडकून रहावं लागलं. फास्ट टॅगच्या तांत्रिक बिघाडामुळे विलंब झाल्याचं सांगण्यात आलं. या घटनेनंतर अमित ठाकरे तेथून निघून गेले. पण मनसे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रागाच्या भावनेतून या टोलनाक्याची तोडफोड केली.

2-3 वाहनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते टोलनाक्याला दाखल झाले. यानंत त्यांनी टोलनाक्याच्या केबिनच्या काचा फोडल्या आणि तेथून निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेबाबत अद्याप कोणीही तक्रार केली नाही. पोलीसांनी या घटनेचा तपास करायला सुरुवात केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in