'या' मराठी अभिनेत्याचा ठाकरे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंच्या हातून बांधले शिवबंधन: राजकीय पोस्टमुळे आले होते अडचणीत

बऱ्याच दिवसांपासून किरण माने राजकारणात जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आज त्यांच्या ठाकरे गटात प्रवेशाने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
'या' मराठी अभिनेत्याचा ठाकरे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंच्या हातून बांधले शिवबंधन:  राजकीय पोस्टमुळे आले होते अडचणीत

'बिग बॉस मराठी' आणि 'मुलगी झाली हो' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते किरण माने यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांनी शिवबंधन बांधत पक्षप्रवेश केला. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून माने यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. काही महिन्यांपूर्वी राजकीय भूमिका घेतल्याने एका मनोरंजनक करणाऱ्या वाहिनीने मालिकेतून काढल्याचा आरोप माने यांनी केला होता. यावेळी ठाकरे गटाचे अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.

"शिवसेना सर्वसामान्यांची आहे. राजकारण गढूळ झालेले असताना एकटा माणूस लढत आहे. त्यामुळे मी एक संवेदनशील अभिनेता म्हणून माणूस म्हणून सोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. संविधान वाचवण्यासाठी मी पक्षामार्फत काम करेल. मिळेल ती जबाबदारी घेऊन काम करेल", असे माने यावेळी म्हणाले. बऱ्याच दिवसांपासून ते राजकारणात जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आज त्यांच्या ठाकरे गटात प्रवेशाने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

राजकीय पोस्टमुळे आले होते अडचणी-

किरण माने हे कलकार असून त्यांच्या ठाम राजकीय भूमिकेमुळे देखील ते ओळखले जातात. त्यांची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. 'मुलगी झाली हो' या मालिकेत 'विलास पाटील' हे पात्र साकारत असताना त्यांनी ही पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यावेळी राजकीय दबावातून वाहिनीने मालिकेतून काढले असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

अनेक कार्यकर्त्यांच्याही हाती शिवबंधन-

माने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा देखील ठाकरे गटात प्रवेश पार पडला. उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना शिवबंधन बांधून त्यांना ठाकरे गटात प्रवेश दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना "आपल्या घरात आल्यासारखे वाटतेय. पूर्वी शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आहे", अशी भावना व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in