Har Har Mahadev: या लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तर सिनेमा बघणाऱ्यांना नाही का? ; शरद पोक्षेंचा सवाल

चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाल्यानंतर लोकांना हे कस सुचत? असा प्रश्न शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी विचारला.
Har Har Mahadev: या लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तर सिनेमा बघणाऱ्यांना नाही का? ; शरद पोक्षेंचा सवाल

सध्या हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरुन राज्यात वादाच्या ठिणग्या उडत असून याचे पडसाद आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजीराजे यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीनेही त्यांना पाठिंबा दिला असून, निषेध नोंदवला. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध मनसे वादात, एकीकडे राष्ट्रवादीने चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचे शो बंद पाडत आहेत, तर दुसरीकडे मनसे चित्रपटाच्या बाजूने उभा राहून बंद पडलेले शो पुन्हा सुरु करायला लावत आहेत.

"सिनेमा चालू असतात लोकांना मारणं हा हलकटपणा आहे. तुम्ही गुंड आहात का? या लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर सिनेमा बघणाऱ्यांना नाही का?" प्रेक्षकांना मारहाण करणाऱ्यांना अशी विचारणा करत अभिनेते शरद पोंक्षे यांनीदेखील आपले मत व्यक्त केले आहे. पंढरपूर येथे हिंदू महासभेच्या वतीने शरद पोंक्षे याना क्रांतिवीर वसंत दादा बडवे हिंदूत्व शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शरद पोंक्षे यावेळी म्हणाले की, "हा मुर्खपणा आहे. सिनेमा सेन्सॉर झाला आहे. मी त्या चित्रपटात काम केले आहे. सेन्सॉरला आमच्या दिग्दर्शकांनी पुरावे दिले आहेत. चित्रपटात इतिहासाची कोणतीही मोडतोड झालेली नसून याबाबत आक्षेप घेणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना चित्रपटाचे दिग्दर्शक भेटणार आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाल्यानंतर लोकांना हे कस सुचत? सत्ता गेलेली आहे म्हणून पब्लिसिटीसाठी हे घडवून आणण्यात येत आहे. अभिजित देशपांडे यांनी अभ्यास करुन चित्रपटाची पटकथा लिहिली आहे."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in