हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक; पुणे CID च्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकास अटक

हॉटेल व्यावसायिकाची एक कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकास अटक करण्यात आली आहे.
हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक; पुणे CID च्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकास अटक
Published on

कराड : मद्यविक्रीचा परवाना मिळवून देतो, असे आमिष दाखवत महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकाची एक कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकास अटक करण्यात आली आहे. श्रीकांत कोल्हापुरे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याला वाई न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात वाई पोलीस ठाण्यात एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी हेमंत साळवी (रा. महाबळेश्वर) यांनी यापूर्वीच याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्याचा तपास सुरू असतानाच वाई पोलीसांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या चार झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in