अदिती तटकरे यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिल्या महिला मंत्री होण्याचा मान

अजित पवारांसह नऊ नेत्यांनी मंत्र पदाची शपथ घेतली आहे
अदिती तटकरे यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिल्या महिला मंत्री होण्याचा मान

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या एका मोठा गट बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये सामील झाला आहे. अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर आदिती तटकरे यांच्या रुपाने शिंदे सरकारला पहिली महिला मंत्री मिळाली आहे. आतापर्यंत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्याने टीका केली जात होती. आता आदिती तटकरे यांनी मंत्रपदाची शपथ घेल्यानंतर त्यांना शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिल्या महिला मंत्री होण्याचा मान मिळाला आहे..

अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत इतर आठ नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यात छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम आणि संजय बनसोडे यांचा समावेश आहे.

शरद पवार यांना मोठा धक्का

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडला असून राष्ट्रवादी काँग्रेसचा एका मोठ्या गट अजित पवार यांच्या नेतृत्वात बंडखोरी करत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षेनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र, यासोबतच राष्ट्रवादीचे दोन खासदार देखील अजित पवार यांच्या सोबत गेल्याचं सांगितलं जात आहे. सध्या राष्ट्रवादीचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुनिल तटकरे हे दोन्ही खासदार राजभवनात उपस्थित आहेत. हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in