राज्यातील रुग्णांच्या मृत्यूवरून आदित्य ठाकरे संतप्त ; म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना थोडीतरी शरम..."

रुग्णालयांची परिस्थिती आणि औषधांचा तुटवडा यामुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या तक्रारी मृत्यांच्या नातेवाईकांकडून केले जात आहेत.
राज्यातील रुग्णांच्या मृत्यूवरून आदित्य ठाकरे संतप्त ; म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना थोडीतरी शरम..."

सुरुवातील ठाण्याच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज मेमोरेबल रुग्णालय, त्यानंतर नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालय आणि आता नागपूर येथे देखील असाच प्रकार समोर आल्याने राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. रुग्णालयांची परिस्थिती आणि औषधांचा तुटवडा यामुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या तक्रारी मृत्यांच्या नातेवाईकांकडून केले जात आहेत. शासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. असं असताना विरोधकांडून मात्र सरकारवर टीका केली जात आहे. ठाकरे गटाने नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सरकारच्या निर्लज्ज अकार्यक्षणतेमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. "काही आठवड्यांपूर्वी ठाणे (बेकायदा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ) आणि गेल्या तीन दिवसात नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असणाऱ्या एका राज्यात एका सरकारी रुग्णालयात फक्त ऑक्सिजन किंवा औषधांच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्ण मरण पावतात याची कल्पनाही करवत नाही. त्याहून वाईट म्हणजे राज्य सरकारच्या निर्लज्ज अकार्यक्षमतेमुळे नवजात बालकांचा यामुळे मृत्यू व्हावा", असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, "हे सगळ घडत असताना आपले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला मंत्रीमंडळ विस्तारावत चर्चा करण्यासाठी गेले. पण त्यांनी या शहरांना किंवा मृतांच्या नातेवाईकांना भेट दिली नाही. जर मी मुख्यमंत्र्यांच्या विदेश दौऱ्याचा किंवा सुट्टीला मुद्दा उपस्थित केला नसता, तर आत्ता घडीला ते बाहेर सुट्टीवर असते.", अशी खोचक टीका देखील आदित्या यांनी यावेळी केली.

आज ते पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात व्यस्त आहेत. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून ते वाद घालत होते. पण या राष्ट्रीय आपत्तीवर बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. हे अवमानकारक आमि धक्कादायक आहे. पण मिंधे व भाजपाच्या अकार्यक्षण घटनाविरोधी व हुकुमशाही वृत्तीच्या सरकारला हे साजेसंच आहे. अशा शब्दात आदित्य यांनी शिंदे सरकारला धारेवर धरलं.

दरम्यान, राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये झालेल्या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी आदित्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, "मी राज्य सरकारला मुंबई महानगर पालिकेच्या व राज्य सरकारच्या मुंबईतील रुग्णालयांतल्या परिस्थितीविषयी २९ सप्टेंबर रोजीच लेखी कळवलं आहे. अशी परिस्थिती पुन्हा ओढवू शकते असा इशारा देखील दिला आहे. आता हे महाराष्ट्र विरोधी अकार्यक्षम सरकार चालवण्याची मुख्यमंत्र्यांना थोडीतरी शरम वाटेल का? ते आरोग्य मंत्र्यांचा राजीनामा घेतली का? या सर्व पार्श्वभूमीवर ते स्वत: राजीनामा देतील का?" असा सवाल आदित्य यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in