आदित्य ठाकरेंचे पालिका आयुक्तांना पत्र ; १० प्रश्नांची उत्तरे देण्यात यावी अशी मागणी

१० प्रश्नांची उत्तरे देण्यात यावी अशी मागणी करणारे पत्रही आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना दिले
आदित्य ठाकरेंचे पालिका आयुक्तांना पत्र ; १० प्रश्नांची उत्तरे देण्यात यावी अशी मागणी

मुंबईतील ४०० किमीच्या रस्त्यांच्या मेगा कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठया प्रमाणावर अनियमितता आहे. हा अपारदर्शक प्रशासनाचा एक मोठा घोटाळा आहे. याची सूत्रे नगरविकास खाते सांभाळणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात आहेत असा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ६ हजार ८० कोटींच्या या कामात ५ कंत्राटदारांना कार्टेल करून पूर्ण गुप्तता पाळून ही कामे वाटून देण्यात आली आहेत. या प्रकरणी आपण उपस्थित केलेल्या १० प्रश्नांची उत्तरे देण्यात यावी अशी मागणी करणारे पत्रही आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना दिले आहे.

मुंबई महापालिकेच्या ४०० किमीच्या रस्त्यांच्या कामात मोठया प्रमाणात अनियमितता झाल्याचे आदित्य ठाकरे यांचे म्हणणे आहे.मार्च २०२२ पासून नगरसेवकांचा कार्यकाळ संपलेला असताना त्यांच्या अनुपस्थितीत ही ४०० किमी लांबीच्या रस्त्यांची कामे कोणी प्रस्तावित केली. नगरसेवकांच्या समित्या नसताना ही कामे कोणी मंजूर केली. प्रस्तावित १० टक्के आगाउ रक्कम कंत्राटदारांना देण्यात आली किंवा नाही. या करारांमध्ये भाववाढ न होण्याची अट घातली आहे का? इतर कोणत्या कामामुळे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. ३१ मे पर्यंत ही कामे सुरू झाली नाही तर सुधारित कालमर्यादा काय असणार आहे? आदी दहा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in