Aditya Thackeray : "शेतात दोन हॅलिपॅड असलेला राज्यातला एकमेव शेतकरी"; काय म्हणाले आदित्य ठाकरे?

औरंगाबादमधील पैठणमधील (Aditya Thackeray) बिडकीन येथे शिवसंवाद यात्रेदरम्यान केली सत्ताधाऱ्यांवर टीका; मुख्यमंत्रीणवर साधला निशाणा
Aditya Thackeray : "शेतात दोन हॅलिपॅड असलेला राज्यातला एकमेव शेतकरी"; काय म्हणाले आदित्य ठाकरे?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे सध्या शिवसंवाद यात्रेनिमित्त राज्यातील अनेक गावांमध्ये भेट देत आहेत. यावेळी औरंगाबादमधील पैठण येथील बिडकीन येथे त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "न्याय आपल्या बाजूनेच होणार फक्त दोन-तीन महिने थांबा. आज नाहीतर उद्या हे ४० गद्दार राजकारणातून हद्दपार होणारच आहेत." असा विश्वास त्यांनी दर्शवला. पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "राज्यात असा एकमेव शेतकरी आहे, ज्याचा शेतात २ हेलिपॅड आहेत."

आदित्य ठाकरे म्हणाले की, "एकीकडे घाम गाळणारा शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहे, तर दुसरीकडे ज्यांच्या शेतात दोन हेलिपॅड उतरतात असा राज्यातला एकमेव शेतकरी म्हणजे मुख्यमंत्री. 'सत्तामेव जयते'ला महत्त्व नाही तर ‘सत्यमेव जयते’ला शिवसेना महत्त्व देते. कृषी व उद्योग हे डबल इंजिन आपल्याकडे आहे. 'ओला दुष्काळ जाहीर करा, नाही तर खुर्च्या खाली करा', या आमच्या मागणीनंतरही सत्ताधारी हे खुर्च्यांना पकडून राहिले आहेत. त्यामुळे त्यांना ओला दुष्काळ दिसला नाही," असे टीकास्त्र त्यांनी यावेळी सोडले.

पुढे ते म्हणाले की, "महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असताना कोणत्याही जाचक अटींशिवाय सरसकट मदत ही शेतकऱ्यांना देण्यात आली होती. ज्या सुरतमध्ये गद्दार लपून बसले होते, त्या गुजरात सरकारचे आभार मानायला यांनी महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवले. युवकांचा रोजगार आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई खोके गँगने हिरावली. खोके गँग ही महाराष्ट्रद्वेषी असून ती टक्केवारीत अडकली आहे" अशी टीका आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.

logo
marathi.freepressjournal.in