शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह गमवल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पोस्ट केला 'हा' फोटो

उद्धव ठाकरेंनी धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव शिवसेना दोन्ही गमावले आहे. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाणार
शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह गमवल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पोस्ट केला 'हा' फोटो

ठाकरे गट आणि शिंदे गटातील वादावर निकाल देताना निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण दिले. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव शिवसेना दोन्ही गमावले आहे. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण ठाकरे कुटुंबापासून वेगळे झाल्याची बातमी शुक्रवारी सायंकाळी वाजल्यापासून राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. या सर्व प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी सविस्तर प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली. मात्र आदित्य ठाकरे यांनी एक फोटो पोस्ट केला आहे.


पोस्ट केलेल्या फोटोत काय आहे?

मातोश्रीच्या खिडकीत बाळासाहेब ठाकरे उभे आहेत. त्यांच्या एका बाजूला उद्धव ठाकरे हसत हसत बाहेर बघत आहेत तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे आहेत. हा फोटो आदित्य ठाकरे यांनी इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर पोस्ट केला आहे. या फोटोत आदित्य ठाकरेंचा चेहरा खूपच गंभीर आहे. जून 2022 ला शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढून पक्षाला वाचवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना नवी उभारी देण्याचा अतिशय प्रयत्न केल्याचे महाराष्ट्राने पाहिले. 
आदित्य ठाकरे यांनी आजोबा बाळासाहेब ठाकरे, वडील उद्धव ठाकरे आणि स्वतःचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तीन पिढ्या दिसत आहेत. तीन पिढ्यांपासून हाती असलेली शिवसेना निवडणूक आयोगाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे.

logo
marathi.freepressjournal.in