आदित्य ठाकरे ‘भारत जोडो यात्रे'त सहभागी होणार

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे या यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा होती. पण त्यांचा सहभाग अनिश्चित असला तरी...
आदित्य ठाकरे ‘भारत जोडो यात्रे'त सहभागी होणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेत राज्यातील महाविकास आघाडीतील नेतेही सहभागी होणार आहेत. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे या यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा होती. पण त्यांचा सहभाग अनिश्चित असला तरी आदित्य ठाकरे मात्र यात सहभागी होणार आहेत. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, “भारत जोडो यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वीच या यात्रेत सहभागासाठी गर्दी जमायला लागली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत की नाही, याची माहिती नाही. पण आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.”

दरम्यान, भारत जोडो यात्रा सोमवारी राज्यात दाखल होणार असून त्यासाठी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सध्या ही यात्रा नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथपर्यंत पोहोचली आहे. भव्य मशाल यात्रेद्वारे ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे.

राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार

‘भारत जोडो’ या उपक्रमात राहुल गांधी यांच्यासमवेत १० नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे सहभागी होणार आहेत. शिवाय जाहीर सभेतही उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in