आदित्य ठाकरेंच्या १ जुलैच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली, संजय राऊत यांची संतप्त प्रतिक्रिया

१ जुलै रोजीच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याची माहिती अरविंद सांवत यांनी दिली आहे
आदित्य ठाकरेंच्या १ जुलैच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली, संजय राऊत यांची संतप्त प्रतिक्रिया

ठाकरे गटाचे युवा नेते, माजी मंत्री आदित्या ठाकरे यांच्या नेतृत्वात १ जूलै रोजी मुंबई महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. मात्र, मुंबई पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे मुख्यप्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोविड काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथिक कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून कारवाई सुरु आहे. या कारवाईत आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण आणि संजय राऊत यांचे निकटवर्ती अडणीत आले आहेत. मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार सुरु असल्याने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात १ जुलै रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. आता मुंबई पोलिसांनी १ जुलै रोजीच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याची माहिती अरविंद सांवत यांनी दिली आहे.

संजय राऊत यांना यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्न असेल आणि त्यामुळे मोर्चाला परवानगी नाकारली जाणार असेल तर आम्ही कोण आहोत? हा काय अतिरेक्यांचा मोर्चा आहे का? हा मुंबईच्या जनतेच्या मोर्चा आहे", असं राऊत म्हणाले आहेत. तसंच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था कोसळली हे स्पष्ट असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना राऊत यांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर देखील भाष्य केलं. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोणी राजकारणात खेचत नाही. राष्ट्रपूरुषांच्या अवमानाबद्दल जी शिक्षा दिली जाते ती शिक्षा अभियंत्याला ठोठवायला हवी, असंही राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांनी केंद्रसरकार देखील भ्रष्टाराचावरुन देखील ताशेरे ओढले. काँग्रेस नेते राहुल गांधींनी भ्रष्टाचाराबाबत जे संसदेत विचारल त्यावर काउत्तरे दिली नाहीत? संसद चालत नाही, कारण तुम्ही उत्तरे देत नाहीत, असं देखील राऊत म्हटलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in