दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी? उद्धव ठाकरे थेटच बोलले

नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असून आज उद्धव ठाकरे यांनी देखील अधिवेशनात हजेरी लावली
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी? उद्धव ठाकरे थेटच बोलले

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची दिशा सालियान मृत्यू प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (SIT)चौकशी करण्यात येणार असल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. असं असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राज्यातील शिंदे सरकारला थेट इशारा दिला आहे. तुमच्याही कुटुंबाच्या आम्ही सांगू तेव्हा एसआयटी चौकशा लावू, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असून आज उद्धव ठाकरे यांनी देखील अधिवेशनात हजेरी लावली. यावेळी प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

याप्रकरणी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "ज्यांच्यापासून भिती असते, आरोप त्यांच्यावर केले जातात. पण, आम्हालाही एसआयटी चौकशा लावता येतील. त्यामुळे त्यांनी त्यांच्यात जाऊ नये. अन्यथा आम्ही सांगू तेव्हा तुमच्या कुटुंबीयांची एसआयटी चौकशी लावू"

यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर देखील भाष्य केलं. मराठा आरक्षणाप्रश्नी शिवसेनेच्या खासदारांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. ज्यांना आरक्षण असेल, त्यांना आरक्षण द्यावं, पण कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं, अशी मागणी त्यांनी केली.

नवाब मलिक प्रकरणावर देखील भाष्य

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी प्रफुल्ल पटेलांवर भाजपचा चांगलंच घेरलं. ते म्हणाले, नवाब मलिक यांना धूर ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहिलं होतं. प्रफुल्ल पटेलांबाबत तोच न्याय लावणार आहात की नाही? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

logo
marathi.freepressjournal.in