इर्शाळवाडी दुर्घटनेवर प्रशासनाचा मोठा निर्णय ; 'या' कालावधीसाठी ट्रेकर्स, पर्यटक यांना येण्यास बंदी

बेस कॅम्प परिसरात शासकीय मदत यंत्रणा तसंच मदतकार्यात नेमणुक केलेल्या इतर व्यक्ती व सेवाभावी संस्था यांच्या व्यतीरिक्त इतरांना वावरण्यास बंदी घालण्यात आली आहे
इर्शाळवाडी दुर्घटनेवर प्रशासनाचा मोठा निर्णय ; 'या' कालावधीसाठी ट्रेकर्स, पर्यटक यांना येण्यास बंदी

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून त्यात अख्ख गाव गाडलं गेल. या घटनेत आतापर्यंत 27 गावकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जणांना दुखापत झाली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या गावकऱ्यांसह त्यांची पाळीव जनावर देखील मलब्याखाली दबले गेले आहेत. अजून 54 लोक या ठिकाणी दबले गेल्याची शक्यता वर्तवली गेली असून अजूनही मदतकार्य सुरु आहे. 100 हुन अधीक लोकांना बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आलं आहे. मुंबई कोकणसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असेल्याने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशात प्रशासन एक मोठा निर्णय घेतला आहे.

सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तसंच इर्शाळगड दुर्घटना घडल्यामुळे प्रशासनाने रायगडवरील ट्रेकिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात अनेकजण ट्रेकिंगसाठी येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे बचावकार्य करण्यात अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाला बऱ्याच अडचणींना समोरं जावं लागत असल्याने रायगडमध्ये नागरिक, पर्यटक व ट्रेकर्स यांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यावेळी या परिसरात विनाकारण वावरण्यास मनाई करण्यात आली आहे.

दरड कोसळलेल्या घटनास्थळांच्या ठिकाणी व त्यांच्या परिसरात इरसालगड, नंबराची वाडी येथील दुर्घटनास्थळी , बेस कॅम्प परिसरात शासकीय मदत यंत्रणा तसंच मदतकार्यात नेमणुक केलेल्या इतर व्यक्ती व सेवाभावी संस्था यांच्या व्यतीरिक्त इतर नागिरक, पर्यटन व ट्रेकर्स यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या भागात या व्यक्तीव्यतिरिक्त इतर नागिक, ट्रेकर्स मंडळी, पर्यटक आले असेल तर भारतीय दंड संहिता 1973 चे कलम 144(1) नुसार 23 जुलै पासून 6 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश उपविभागीय दंडाधिकारी कर्जत अजित नैराळे यांनी लागू केले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in