आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू

राज्यातील शासकीय, खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्यांक संस्थांमधील आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू
Pixabay
Published on

मुंबई : राज्यातील शासकीय, खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्यांक संस्थांमधील आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २३ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या गुणवत्ता यादीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येते. नीट परीक्षेतील गोंधळामुळे आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली होती. याबाबतचा पेच सुटल्यानंतर अखेर सीईटी कक्षाने आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक शुल्कासह ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी फॉर्म न भरणाऱ्या विद्यार्थांचा या अभ्यासक्रमांच्या कोणत्याही कोट्यातील प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in