अन्य राज्यात बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना राज्यातील कोट्यातून प्रवेश

महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्यातील कोट्यातून प्रवेश मिळत मिळणार आहे.
अन्य राज्यात बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना राज्यातील कोट्यातून प्रवेश
FPJ NEWS SERVICE
Published on

मुंबई : महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्यातील कोट्यातून प्रवेश मिळत मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसीन (बीएएमएस) पदवी विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

वर्षा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमवेत शनिवारी झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना आयुर्वेद विद्यार्थ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी लगेच सादर करण्याचे निर्देश दिले.

राज्याच्या ८५ टक्के कोटा (शासकीय व खासगी अनुदानित) तसेच ७० टक्के कोटा (खासगी विना अनुदानित) या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in