जेईई मुख्य परीक्षेत महाराष्ट्रातून अद्वय क्रिष्णा पहिला

अद्वयने दहावीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतही यश मिळवले होते.
जेईई मुख्य परीक्षेत महाराष्ट्रातून अद्वय क्रिष्णा  पहिला
Published on

नॅशनल टेस्टिंग एजन्सी’(एनटीए) ने सोमवारी ‘जेईई’ मुख्य परीक्षा-२०२२ सत्र एकचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत महाराष्ट्रातून अद्वय क्रिष्णा हा विद्यार्थी पहिला आला आहे. त्याला ९९.९९८४४९ पर्सेन्टाईल मिळाले आहेत. अद्वयला दहावी परीक्षेत ९६.८ टक्के गुण मिळाले होते. तो जैन इंटरनॅशनल शाळेचा विद्यार्थी असून त्याने सीबीएसई बारावीची परीक्षा दिली आहे. मूळचा उत्तर प्रदेश येथील असलेल्या अद्वयचे वडील वेकोलिमध्ये नोकरीला आहेत. अद्वयने दहावीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतही यश मिळवले होते. ‘जेईई’साठी अंतिम कटऑफ या परीक्षेत पात्र ठरण्यासाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के तर एससी, एसटीसाठी ६५ टक्के गुण आवश्यक आहेत. या परीक्षेची अंतिम उत्तराची यादी नुकतीच ६ जुलैला प्रसिद्ध झाली होती. या परीक्षेत अपेक्षित टक्के मिळवलेले विद्यार्थी पुढील सत्रासाठी पात्र ठरले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in