तानाजी सावंतांना धक्का; संरक्षणासाठी असलेल्या ४८ पोलिसांपैकी ४७ पोलीस काढून घेतले

मुंबई : मुलाची बँकॉकवारी रोखल्याने चर्चेत आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना गृह विभागाने चांगलाच धक्का दिल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी तानाजी सावंतांच्या सुरक्षा ताफ्यात ४८ पोलिसांचा समावेश होता, मात्र आता केवळ एकच पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे.
तानाजी सावंतांना धक्का; संरक्षणासाठी असलेल्या ४८ पोलिसांपैकी ४७ पोलीस काढून
तानाजी सावंतांना धक्का; संरक्षणासाठी असलेल्या ४८ पोलिसांपैकी ४७ पोलीस काढूनFacebook - Tanaji Sawant
Published on

मुंबई : मुलाची बँकॉकवारी रोखल्याने चर्चेत आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना गृह विभागाने चांगलाच धक्का दिल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी तानाजी सावंतांच्या सुरक्षा ताफ्यात ४८ पोलिसांचा समावेश होता, मात्र आता केवळ एकच पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे.

तानाजी सावंत यांच्यासह शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक नेते आणि आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांना साथ दिलेल्या आमदारांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. परंतु आता जीवितास धोका नसणाऱ्या विविध पक्षांच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली असून त्यात शिंदेसेनेच्या आमदारांचाही समावेश आहे.

तानाजी सावंत यांनी राजकीय वजन वापरून आपल्या सुरक्षा व्यवस्थेत ४८ पोलिसांचा समावेश करून घेतला होता. परंतु, नेत्यांच्या दिमतीलाच पोलीस अडकून पडत असल्याने पोलीस प्रशासनावर ताण येऊ लागल्याने आता गृह विभागाने नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेत त्यांचे संरक्षण कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

तानाजी सावंत यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ४८ पोलिसांपैकी ४७ पोलीस काढून घेण्यात आले असून, आता केवळ एक पोलीस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी राहणार आहे. आधीच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले सावंत हे आता आमदार असून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आले आहे. अशातच आता सुरक्षा व्यवस्थाही काढून घेण्यात आल्याने त्यांचे राजकीय वजन घटल्याची चर्चा रंगू लागली आहे.

logo
marathi.freepressjournal.in